esakal | Loksabha 2019 : मोदी-शहांना नाही कोणाचेही सुख-दु:ख : राज ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : मोदी-शहांना नाही कोणाचेही सुख-दु:ख : राज ठाकरे

- बेसावध होऊ नका, यासाठी मी प्रचारसभा घेत आहे.

Loksabha 2019 : मोदी-शहांना नाही कोणाचेही सुख-दु:ख : राज ठाकरे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सातारा : तुम्ही बेसावध होऊ नये, यासाठी मी प्रचारसभा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जे रंग दाखविले याच्यावरून अंदाज येतो की ते पुढे काय करू शकतात. मोदी-शहांना कोणाचेही सुख-दु:ख नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांच्यावर आज (बुधवार) निशाणा साधला.

सातारा येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पाच वर्षांत देशातील एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायला पंतप्रधान मोदी तयार नाहीत. जी स्वप्न दाखविली त्याबाबत आता एक शब्दही ते बोलायला तयार नाहीत. दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. नोटाबंदीच्या काळात चार ते साडेचार कोटी लोकांच्या नोकऱया गेल्या. पण याच काळात मोदींनी दिल्लीत भाजपचे सेव्हन स्टार कार्यालय उभे केले. 

loading image