Loksabha 2019 : मोदींना झटका आला अन् केली नोटाबंदी : राज ठाकरे

बुधवार, 24 एप्रिल 2019

- मोदींना झटका आला अन् त्यांनी नोटाबंदी केली. 

- नोटाबंदीने काहीही सिद्ध झाले नाही.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. खासदार निधीतून गावाचा विकास करायचा ते सुधरवायचे, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्या मतदारसंघातीलच परिस्थिती गंभीर बनली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच मोदींना झटका आला अन् त्यांनी नोटाबंदी केली, असेही ते म्हणाले.

मुंबई येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी खोटं बोलत आहेत. साडेआठ लाख शौचालय एका आठवड्यात बांधले असे त्यांनी बिहारमध्ये झालेल्या सभेत सांगितले होते. असे असेल तर मग सेकंदाला 7 शौचालय बांधलीत का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

तसेच प्रधानसेवक ही संकल्पना पंडित जवाहरलाल यांची आहे. त्यांनी प्रथमसेवक म्हणा असे सांगितले होते. तर आता मोदी स्वत:ला प्रधानसेवक म्हणत आहेत. यापूर्वी देशात 410 रुपयांना मिळणारा सिलिंडर 700-800 रुपयांना मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticizes PM Narendra Modi in Mumbai