SakalSaamExitPolls : कोकणात युतीचीच लाट; बाकी सपाट!

रविवार, 19 मे 2019

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र 'सकाळ' आणि 'साम टीव्ही'च्या विश्वासार्ह सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत.

एक्झिट पोल 2019 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र 'सकाळ' आणि 'साम टीव्ही'च्या विश्वासार्ह सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत.

'सकाळ' आणि 'साम'ने राज्यभरात घेतलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेले राजकीय चित्रही स्पष्ट झाले आहे. यावेळी कोकणामध्ये विरोधी पक्षांनी जोर लावला होता; पण कोकणातील एकूण सहा जागांपैकी तब्बल पाच जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होतील, असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. तर इतर एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांना मिळून ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी 'मोदी लाट' आहे की नाही, याची जोरदार चर्चा देशभरात सुरू असली, तरीही कोकणामध्ये मात्र शिवसेना-भाजपचीच लाट राहील, हे निश्चित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Saam Exit Poll results BJP Shiv Sena to win Kokan