Loksabha 2019 : मोदी-शहांवर कारवाईस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मे 2019

- काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी दाखल केले होते प्रतिज्ञापत्र.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान द्वेषपूर्ण भाषण केले होते. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाला मोदी-शहांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. 

काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे विनंती केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की मोदी-शहांविरोधातील तक्रारींवर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यात यावे, अशी विनंती केली होती. याशिवाय देव यांनी आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करत निवडणूक आयोग मोदी-शहा यांची बाजू घेत आहे, असा गंभीर आरोपही केला होता. 

तसेच मोदी-शहा यांना कोणतेही कारण न देता निवडणूक आयोगाने क्लीनचिट देणारे अनेक आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे, असेही त्यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC says it can not interfere with EC clean chits to PM Modi Amit Shah