Election Results : मागील निवडणुकीपेक्षा यंदा अधिक जागा मिळतील : मुख्यमंत्री

गुरुवार, 23 मे 2019

- सध्या देशात 'सायलंट व्हेव'. 

लोकसभा निकाल 2019 : देशात मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळत आहे. ही आता 'सायलंट व्हेव' आहे. मोदींना निवडून देण्यात उत्साह आहे. मागील निवडणुकीपेक्षा आम्हाला अधिक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच लोकसभेचा हा कौल म्हणजे झोप उडविणारा आहे, असेही ते म्हणाले. 

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, अनेक राजकीय विश्लेषक मानालया तयार नव्हते की भाजपचा विजय होईल. मोदीजी आणि त्यांच्या सरकारने जी काही कामे केली. त्यामुळेच आता हे यश पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक समस्या असल्या तरीदेखील जनतेचा कौल भाजपसोबत आहे. हा कौल मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

तसेच ते पुढे म्हणाले, लोकसभेचा हा कौल म्हणजे झोप उडविणारा आहे. आपली जबाबदारी वाढते. जनतेसाठी जे काय करायचे ते करणार आहोत. त्यांचे प्रेम आमच्यासोबत आहे. घटकपक्षांनीही आम्हाला मोठी साथ दिली. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत केली. रामदास आठवले यांचे मी आभार मानतो. आमच्या सर्व घटक पक्षांचे आभार मानतो. 

मुख्यमंंत्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- महाराष्ट्राच्या जनतेचे आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो.

- प्रचंड अशा प्रकारचं बहुमतं एनडीएला दिलं आहे.

- मोदींजीच्या बाजूने शांततेचं एक लाट होती.

- महाराष्ट्रामध्ये देखील महायुती कामगिरी चांगली केली.

- भाजपा सेना 2014 ला  41 जिंकल्या आता त्या पलीकडे जाऊ असं वाटतयं.

- आम्ही जनतेमध्ये गेल्यावर आम्हांला लाट पाहायला मिळाली.

- युतीच्या सरकारने जी काम केली.त्याबद्दल जनता समाधानी आहे.

- आम्ही सर्व अडचणींच्या सामना करत आम्हांला जनतेने कौल दिला.

मात्र हा कौल झोप उडवणार देखील आहे

- आता आमची जबाबदारी वाढली आहे.जे प्रेम दिलं त्या बदल्यात जास्त काम करू

- उद्धव ठाकरे यांनी आम्हांला आवश्यक ती सर्व मदत केली आहे

- रामदास आठवले यांचे देखील मी आभार मानतो.

- माझे जे सर्व सहकारी आहेत.कोअर टिम आहे.त्यांचे मी विशेष आभार मानतो.त्यांने उत्तम काम केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seats of BJP will increases in This Loksabha Election says CM Fadnavis