ExitPoll 2019 : उत्तर प्रदेशात भाजपला दणका; सप-बसपची मुसंडी

रविवार, 19 मे 2019

- उत्तर प्रदेश लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेले राज्य.

- सत्ता स्थापनेसाठी या राज्याला आहे विशेष महत्त्व. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता असून, समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

उत्तर प्रदेश लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेले राज्य आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी या राज्याला विशेष महत्त्व आहे. या राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील काही एक्झिट पोलचा अंदाज खालीलप्रमाणे :

टाइम्स नाऊ-वीएमआरच्या 'एक्झिट पोल'चा अंदाज

टाइम्स नाऊनुसार मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यंदा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागा

भाजप (एनडीए)- 58
काँग्रेस (यूपीए) - 2
बसपा-सपा- (महागठबंधन) - 20

ABP Nielsen Survey Exit Poll: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता.  

भाजप (एनडीए)- 22
काँग्रेस (यूपीए)- 2
गठबंधन (सपा-बसपा)- 56


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seats of SP and BSP may Increases in Uttar Pradesh