Loksabha 2019 : एक  सेल्फी तो बनती यार..... मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंट

सुहास सदाव्रते 
सोमवार, 22 एप्रिल 2019

शहरातील मतदान केंद्रावर खास करून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे.

जालना  : लोकसभा निवडणुकीसाठी  मंगळवारी (ता.23)  मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षनीय आहे. शहरातील मतदान केंद्रावर खास करून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅटसह  सेल्फी अन हायटेक यंत्रणा मुळे यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण आहे हे विशेष.

लोकसभा निवडणुकीत हायटेक यंत्रणा वापरण्यात आलेली आहे. मतदारांना आपण  मतदान केल्याची पावती काही सेकंद व्हीव्हीपॅट  मशीनवर दिसणार आहे. तर निवडणुक विभागात अद्ययावत  माहिती ठेवण्यासाठी विशेष प्रणाली तयार करण्यात आली आहे. जिल्हयात युवा मतदारांची संख्या ही लक्षनीय आहे. युवकांचे आकर्षण हे सोशल  मिडीयावर अधिक आहे. युवकांना सेल्फीचे आकर्षणही असल्याने सोशल  मिडीयावर आपण काय करतो याचे अपडेट टाकण्याची जणू स्पर्धाच चाललेली असते. युवावर्गाचे हे आकर्षण विचारात घेवून जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी  मतदान केंद्राबाहेर युवकांसाठी  सेल्फी पॉइंट ठेवण्यात येणार आहे.

जालना शहरातील विविध  मतदान केंद्रावर असे  सेल्फी पॉइंट राहणार आहे. शहरातील सीटीए मके गुजराती विद्यालय, राष्टीय हिंदी विद्यालय, सेंट  मेरी हायस्कूल ए म.एस.जैन इंग्लिश स्कूल, श्री मती दानकुँवर कन्या विद्यालय, सरस्वती भुवन प्रशाला, जिल्हा परिषद  मुलांची प्रशाला गटसाधन केंद्र, उर्दू हायस्कूल, जनता प्राथ मिक शाळा, मस्त्योदरी  महाविद्यालय या शहरातील  मतदान केंद्राबाहेर  सेल्फी पॉइंट ठेवण्यात येणार आहे. जालना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गुंडेवाडी व जिल्हा परिषद शाळा भिलपुरी येथील केंद्रावर  सेल्फी पॉइंट ठेवण्यात येणार आहे. जिल्हा निवडणुक स्वीप उपक्र मांतर्गत वोटर  सेल्फी पॉइंट तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील सर्व  मतदान केंद्रावर इतर साहित्याबरोबर  सेल्फी पॉइंट पाठविण्यात आलेले आहेत.   
 
शहरातील  मतदान केंद्राबाहेर  सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले आहे.  मतदारांनी मतदान केल्यांनतर  सेल्फी काढून ते शेअर करावेत आणि राष्टीय महोत्सवात कर्तव्य बजावावे.
- राजू नंदकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selfie points outside the polling booth