Loksabha 2019: ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या''

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

सय्यद पिंपरी : या सरकारला शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांबद्दल अजिबात आस्था नाही. आम्ही शेतमालाच्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचाही विचार करत होतो, मात्र भाजप सरकार फक्त खाणाऱ्यांचा (ग्राहकांचा) विचार करते अशी टीका शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. ''राज्यातील 3 सभांमध्ये मोदींनी माझ्यावर टीका केली आणि नंतरच्या सभेत म्हणतात पवार साहेब तुम्ही चुकीच्या बाजूला आहात, तुम्ही इकडे या''. नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांची प्रचार सभा झाली. यावेळी व्यासपीठावर समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते.

मोदी सरकार म्हणते आम्ही उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देऊ, मात्र आम्ही शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारच्या तुलनेत भाजप सरकारने हमीभावात अत्यल्प वाढ केल्याचेही पवार म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली असेही पवारांनी सांगितले.

माझ्या घरात भांडणं आहेत, माझा पुतण्या पक्ष बळकावतोय, अशी टीका मोदींनी केली. माझी मोदींना विनंती आहे की, माझं मोठं कुटुंब आहे, आम्ही एकत्र आहोत. कुटुंबात राहण्याचे आमच्यावर संस्कार आहेत.''मोदींना कुटुंबच नाही, एकटे राहतात त्यांना नाती काय कळणार अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय जेखी मोदींनी लाटले असल्याचे पवारांनी नमुद केले. पुलवामा हल्ल्याचा बदला लष्कराने घेतला, कारवाई लष्कराने केली, आणि 56-इंच छाती कोण फुगवतंय तर मोदी असे पवार म्हणाले. अभिनंदनला सोडवून आणले त्याचे अभिनंदन आहे. मात्र कुलभूषण जाधवला का सोडवून आणत नाही, तेव्हा कुठे जाते मोदींची 56 इंच छाती असा प्रश्नही पवारांनी मोदींना विचारला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Criticized Narendra Modi