Election Results : कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

- राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांचा केला पराभव.

कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाला आहे. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरवातीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. श्रीकांत शिंदे यांना 444072 मते मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांना 123433 मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे संजय हेदाऊ यांना 52360 मते मिळाली आहेत. 

दरम्यान, बाबाजी पाटील यांच्या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrikant Shinde of Shivsena Won in Kalyan Loksabha Constituency for Lok Sabha 2019