Loksabha 2019 : भाजप नेत्यावर भरपत्रकार परिषदेतच भिरकावली चप्पल

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

भार्गवने चप्पल नेमक्या कोणत्या कारणामुळे भिरकावली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

नवी दिल्ली : भाजपचे नेते खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांची पत्रकार परिषद आज (गुरुवार) सुरु होती. नेमके त्याचदरम्यान उपस्थितांपैकी एकाने त्यांच्यावर चप्पल फेकून मारली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. 

जीवीएल नरसिंहराव यांची दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान, शक्ती भार्गव या तरुणाने त्यांच्यावर चप्पल भिरकावली. या प्रकारानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, भार्गवने चप्पल नेमक्या कोणत्या कारणामुळे भिरकावली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slipper Thrown At MP GVL Narasimha Rao in BJP Press Conference at Delhi