Loksabha 2019 : मोदींची सभा सुरु असतानाच नागरिक फिरले माघारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जनसमुदाय सभास्थळावरुन बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान व्यासपीठावर येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. त्यावेळी उपस्थित असलेला जनसमुदाय मोदींचे भाषण सुरु होताच बाहेर पडण्यास सुरुवात झाली. 

नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) सभा झाली. परंतु, मोदींचे भाषण सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सभेसाठी आलेला जनसमुदाय सभास्थळ सोडून बाहेर पडला.  

जनसमुदाय सभास्थळावरुन बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान व्यासपीठावर येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. त्यावेळी उपस्थित असलेला जनसमुदाय मोदींचे भाषण सुरु होताच बाहेर पडण्यास सुरुवात झाली. 

दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पिंपळगाव येथे मोदींची सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as Modi's speech started the masses left the ground