Loksabha 2019 : राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका राहुल गांधींन भोवली.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना 'चौकीदार चोर है' असे अनेकदा म्हणत असतात. त्यावरूनच आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमान नोटीस बजावली आहे. 

राफेल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी आता न्यायालयानेही 'चौकीदार चोर है' असे विधान केले होते, असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींचे विधान हे न्यायालयाचा अवमान असल्याने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी याबाबत न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. मात्र, राहुल गांधींच्या या दिलगिरीवर लेखी यांनी समाधान व्यक्त केले नाही. त्यानंतर आता न्यायालयाने राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court sent Defamation Notice to Rahul Gandhi