Loksabha 2019 : राज्यात तिसऱ्या टप्प्यात 62.37 टक्के मतदान; पुण्यात सर्वांत कमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले. तर कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक 70.70 टक्‍के मतदान झाले आहे. पुण्यातील नीचांकी मतदानाने सर्वच पक्षांचे उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात मतदानाचा टक्‍का वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

या 14 मतदारसंघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या, तर चार मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदारसंघांत 62.88 टक्के मतदान झाले होते. 

तिसऱ्या टप्प्यातील मतदान (टक्‍क्‍यांमध्ये)

जळगाव 56.12 
रावेर 61 
जालना 64.55 
औरंगाबाद 63.41 
रायगड 61.81 
पुणे 49.84 

बारामती 61.54 
नगर 64.26 
माढा 63.58 
सांगली 65.44 
सातारा 60.37 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग 61.69 
कोल्हापूर 70.70 
हातकणंगले 70.28 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Third Phase 62.37 Percentage Voting Done in Maharastra