Loksabha 2019 : आपले पंतप्रधान कोण होणार, तुम्हीच सांगा...: उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. आपले पंतप्रधान कोण होणार, तर एकच नाव पुढे येते नरेंद्र मोदी. विरोधी पक्षांमध्ये एकही असे नाव नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

औसा : आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. आपले पंतप्रधान कोण होणार, तर एकच नाव पुढे येते नरेंद्र मोदी. विरोधी पक्षांमध्ये एकही असे नाव नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे प्रथमच सभेसाठी एकत्र येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाई नेते रामदास आठवले आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी हा केंद्रबिंदू आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात थापा आहेत. गरिबी हटाओ तुम्ही म्हणता तुमची हटली पण जनतेची केव्हा हटणार आहे. पाकिस्तानने कुरापत काढली तरी आपण आता त्यांना घुसून ठोकतो. पाकिस्तानचा काय तो एकदा निकाल लावावा. मराठवाड्याच्या पाठिशी सरदार वल्लभभाई पटेल उभे राहिले आणि रझाकार निघून गेले. मऱाठवाडा मर्दाची भूमी आहे. त्यावेळी सुल्तानी होती आता आस्नामी आहे. त्यामुळे आज तुम्ही मराठवाड्याला मदत करा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपन्यांची कार्यालये असली पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray speaks in rally at Latur