Loksabha 2019 : '2002 मध्ये वाजपेयीच हटविणार होते मोदींना'

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मे 2019

- गुजरात सरकार बरखास्त करण्याची केली होती तयारी.

- लालकृष्ण अडवानी यांच्यामुळे वाचले मोदींचे पद.

नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी केला.

गुजरातमध्ये 2002 मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर मोठा जातीय हिंसाचार झाला होता. त्यावरून अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना पदावरून दूर करण्याचे ठरविले होते. मात्र, तेव्हा अडवानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती. तसेच राष्ट्रीय कार्यकारी समितीची 2002 मध्ये गोव्यात बैठक झाली.

त्यावेळी मोदींनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाहीतर मोदींचे सरकार बरखास्त केले जाईल, अशीही तयारी सुरु होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vajpayee wanted to sack Modi in 2002 LK Advani stalled it says Yashwant Sinha