Loksabha 2019 : जनतेच्या हितासाठी बोलतच राहणार : राज ठाकरे

गुरुवार, 25 एप्रिल 2019

- पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत.

मुंबई : बहुमत असलेल्या लोकांना खोटं बोलण्याची वेळच का येते? पण मी जनतेच्या हितासाठी त्यांच्या विरोधात बोलतच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात चार ते साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला.

पनवेल येथील गणेश मैदान येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ एडिट करून मोदी गर्दी दाखवत आहेत. देशातील 2 कोटी जणांना रोजगार देण्याचे मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी स्वप्न दाखविले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण केले नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will continue to speak for the welfare of the people says Raj Thackeray