Loksabha 2019 : तुमचं एक मत संपवू शकते दहशतवाद : पंतप्रधान

वृत्तसंस्था
Thursday, 25 April 2019

- तुमचं एक मत द्या मोदींना.

- दहशतवाद संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

दरभंगा : तुमचे एक मत मोदींना दिले तर मोदी दहशतवाद संपवू शकतो. हा दहशतवाद संपवल्यावरच मी शांत बसेन. आपला देश मजबूत असायला हवा आणि त्यासाठी देशात एक मजबूत सरकार हवे. म्हणून तुम्ही सर्वांनी 'चौकीदारा'ला पाठिंबा द्यायला हवा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) मतदारांना आवाहन केले. 

बिहारमधील दरभंगा येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, पाकिस्तानची बाजू घेणारे लोक आता मोदी आणि ईव्हीएमला दोष देत आहेत. या लोकांना जनतेच्या भावना समजत नाहीत. आता मतदारांनी तीन टप्प्यांत झालेल्या मतदानातून त्यांना योग्य तो संदेश दिला आहे. 

तसेच ते म्हणाले, 'महामिलावट' करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत 350 लोकांचे प्राण घेतले. मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your One Vote will Ends Terrorism says Narendra Modi