राणेंनी बालेकिल्ला राखला; केसरकरांची हट्ट्रिक |Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवलीचा बालेकिल्ला अखेर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्रे नीतेश राणे राखला.
शिवसेनेने कडवे आव्हान देऊनही नीतेश राणे यांनी येथे सुमारे 15 हजारांच्या फरकाने बाजी मारली. राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी
सावंतवाडीच्या बालेकिल्ल्यात विजयाची हट्ट्रीक साधली आहे. सलग तीनदा आमदार होण्याचा मान केसरकरांनी मिळवला आहे. अपक्ष उमेदवार राजन तेली यांचा
त्यांनी दुसऱयांदा पराभव केला आहे.

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवलीचा बालेकिल्ला अखेर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्रे नीतेश राणे राखला.
शिवसेनेने कडवे आव्हान देऊनही नीतेश राणे यांनी येथे सुमारे 15 हजारांच्या फरकाने बाजी मारली. राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी
सावंतवाडीच्या बालेकिल्ल्यात विजयाची हट्ट्रीक साधली आहे. सलग तीनदा आमदार होण्याचा मान केसरकरांनी मिळवला आहे. अपक्ष उमेदवार राजन तेली यांचा
त्यांनी दुसऱयांदा पराभव केला आहे. 

सिंधुदुर्गात विधानसभेचे निकाल 2014 च्या धर्तीवरच राहिल्याचे चित्र आहे. चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार
नीतेश राणे सुमारे पंधार हजारांच्या मतांनी विजयी झाले. कुडाळमधून वैभव नाईक यांनी गड राखला. सावंतवाडीत विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी
निर्णायक आघाडी घेतली. तीनपैकी दोन जागा शिवसेनेकडे, तर एक भाजपकडे राहिली. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे 2014 च्या तुलनेत बदलली असली तरी त्या वेळी निवडून आलेलेच आमदार कायम राहतील, अशी स्थिती आहे. दुपारी
12 पर्यंत तिन्ही ठिकाणी बरेचसे चित्र स्पष्ट झाले होते. कणकवलीत सर्वाधिक चुरस होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. गेल्या वेळी कॉंग्रेसच्या तिकिटावर
विजयी झालेले नीतेश राणे या वेळी भाजपतर्फे लढले. त्यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत चिन्ह देऊन उभे केले होते. प्रत्यक्ष मतमोजणीच्या
काही फेऱ्यांमध्ये राणे यांनी घेतलेली आघाडी पाहता फारशी चुरस झाली नसल्याचे स्पष्ट झाले. कणकवली मतदारसंघात नवव्या फेरी अखेर भाजपचे नीतेश राणे
यांना 31517, मनसे राजन दाभोलकर 544, "बसप'चे विजय सळकर यांना 137, शिवसेनेचे सतीश सावंत 18599, कॉंग्रेसचे सुशील राणे 1806,
"वंचित'चे मनाली वनजारे 676 तर वसंत भोसले यांना 147 मते मिळाली होती. या फेरीत राणे यांना 12,918 चे लीड होते. 
कुडाळमध्ये 2014 ला माजी
मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून "जायंट किलर' ठरलेले वैभव नाईक यांच्यासाठी ही लढत एकतर्फी असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात भाजप
पुरस्कृत आणि राणे समर्थक असलेले अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांनी चांगली झुंज दिली; मात्र येथून वैभव नाईक यांनीच बाजी मारली. 
दरम्यान, कुडाळमध्ये
16 व्या फेरीअखेर वैभव नाईक (शिवसेना) 53567, अरविंद मोंडकर (कॉंग्रेस) 2668, रवींद्र कसालकर (बसप)-418, धीरज परब (मनसे)- 1720,
बाळकृष्ण जाधव (अपक्ष) 2510, रणजित देसाई (अपक्ष) 43213 तर सिद्धेश पाटकर (अपक्ष) यांना 644 मते मिळाली होती. या फेरीत वैभव नाईक
आघाडीवर होते. 
सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपने अपक्ष उमेदवार राजन तेली यांना मोठे बळ दिले होते.
येथेही चुरस अपेक्षित होती. मात्र पहिल्या फेरीपासून केसरकर यांनी आघाडी घेतली. दरम्यान, बाराव्या फेरीनंतर दीपक केसरकर (शिवसेना) 4213, प्रकाश रेडकर
(मनसे) 158, बबन साळगावकर (राष्ट्रवादी) 215, सुधाकर माणगावकर (बसप) 22, राजू कदम (बहुजन मुक्ती पार्टी) 60, यशवंत पेडणेकर (बहु महा पार्टी)
24, सत्यवान जाधव (वंचित आघाडी) 116, 
अजिंक्‍य गावडे (अपक्ष) 63, राजन तेली (अपक्ष- भा.पु) 2984. या फेरीत केसरकर यांना 10,891 मतांची
आघाडी होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Kankavali Kudal Sawantwadi trends first phase