बदली होऊन झाला महिना नियुक्ती मात्र प्रतीक्षेतच

IPS officers as well as deputy superintendent of police months since the transfer But the place of appointment has not been decided yet
IPS officers as well as deputy superintendent of police months since the transfer But the place of appointment has not been decided yet

कोल्हापूर : बदली होऊन महिना होत आला; पण अद्याप नियुक्तीचे ठिकाण निश्‍चित नाही. परिणामी राज्यातील १५ आयपीएस अधिकाऱ्यांसह तेवढेच पोलिस उपअधीक्षकही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून, लांबलेल्या या बदल्यांमुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे. कोविड संकटातही नव्या नियुक्तीसाठी  प्रतीक्षा करण्याची वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आली आहे.


राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचीही प्रक्रिया लांबेल असे वाटत होते; पण राज्य शासनाने १३ सप्टेंबर राज्यातील पोलिस अधीक्षक व पोलिस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. ऐन वेळी काही नावे बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या अशी चर्चा सुरू झाली तशी अधिकाऱ्यांच्यात अस्वस्थता वाढू लागली. बदली प्रक्रियेतील १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या सध्याच्या ठिकाणाहून बदल्या झाल्या; पण त्यांना अद्याप नवे पोस्टिंग मिळाले नाही. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ यंदाही कायम राहिला अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात शरीरसौष्ठवपटूंत ‘कहीं खुशी कहीं गम’ -
दरम्यान, इतर अधिकाऱ्यांनाही बदलीसाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी मुदतवाढ द्यावी लागली. आयपीएसपाठोपाठ उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या; पण यातील १४ अधिकाऱ्यांना अद्याप बदलीचे आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत. अद्याप नियुक्तीचे आदेश प्राप्त न झाल्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्यात घालमेल सुरू आहे. कोविड संकटात हा प्रश्‍न सोडवा आणि अधिकाऱ्यांना नवे पोस्टिंग वेळेत द्या, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

नियुक्तीच्या प्रतीक्षेतील अधिकारी


पोलिस अधीक्षक
शिवाजी राठोड (ठाणे ग्रामीण), अखिलेश कुमार सिंग (नगर), पंजाबराव उगले (जळगाव), सुहेल शर्मा (सांगली), एस. चैतन्य (जालना), हर्ष पोद्दार (बीड), विजय मगर (नांदेड), कृष्णकांत उपाध्याय (परभणी), योगेश कुमार गुप्ता (हिंगोली), बसवराज तेली (वर्धा), एम.सी.व्ही महेश्‍वर रेड्डी (चंद्रपूर), मंगेश शिंदे (गोंदीया), एम. राजकुमार (यवतमाळ), राजेंद्र माने (लातूर), संदीपसिंग गिल (प्रशिक्षणार्थी आयपीएस मिरज).

पोलिस उपअधीक्षक
श्रीकांत घुमरे (धुळे), अश्‍विनी पाटील (अहमदपूर, लातूर), माधव पडिले (नाशिक), सिद्धेश्‍वर भोरे (बार्शी), सुशीलकुमार नायक (यवतमाळ), शांताराम वळवी (ठाणे), किशोर काळे (जयसिंगपूर), डॉ. सागर कवडे (सोलापूर), संदीप मिटके (नगर), अंगद जाधवर (गडहिंग्लज), रणजित पाटील (रायगड), भाऊराव महामुनी (सातारा), रिना जनबंधू (भंडारा), सोमनाथ वाकचौरे (शिर्डी).

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com