Maratha Kranti Morcha: एसटी संभ्रमावस्थेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

मुंबई - मराठा आरक्षणासाठी उद्या (ता. 9) क्रांतीदिनी महाराष्ट्र "बंद'ची एसटीला धास्ती लागली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत. आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे "बंद'च्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद या संभ्रमावस्थेत व्यवस्थापन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात आंदोलनामध्ये सरकारवरच्या रोषाचा सगळ्यात जास्त फटका एसटीला बसला आहे. गेल्या वर्षभरात पाच जून 2017 ते 18 जुलै 2018 या काळात एसटीच्या 222 बसचे एकूण 60 लाख 88 हजार रुपयांचे नुकसान झाले होते, तर मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 365 गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाला तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

- एकूण बसची मोडतोड - 365
- बसचे नुकसान - 1 कोटी 50 लाख रुपये
- बुडालेला महसूल - 22 कोटी 25 लाख रुपये

परिपत्रकात व्यवस्थापनाच्या सूचना
- आंदोलकांनी एसटीवर हल्ला केल्यास चालक-वाहकांनी चित्रीकरण करावे
- विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष सुरू करा
- "बंद' काळात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करा
- "बंद' काळात एसटीला जाळ्या बसवून घ्या; पुरेसा पोलिस बंदोबस्त मागवून घ्यावा
- सर्व आगारांतील सीसी टीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करा.

मराठा समाजातील आंदोलक एसटीला लक्ष करत नाहीत. काही समाजकंटक त्यांच्याआडून एसटीवर दगड मारतात. संघटनांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे एसटी सुरू राहील. तोडलेल्या बस पुन्हा दुरुस्त करता येतील; पण मराठा आरक्षणासाठी गेलेले जीव
परत येतील का?
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation ST Maharashtra Bandh