Maratha Kranti Morcha: 'आरएएफ'चे जवान पंढरपुरात दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

पंढरपूर - मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या पंढरपुरात प्रथमच केंद्राच्या शीघ्र कृती दलाचे (आरएएफ) सुमारे 200 जवान आज दाखल झाले आहेत.

पंढरपूर - मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या पंढरपुरात प्रथमच केंद्राच्या शीघ्र कृती दलाचे (आरएएफ) सुमारे 200 जवान आज दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पंढरपुरात एसटी बस गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. ठिय्या आंदोलनानंतर सकल मराठा समाजातर्फे उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. येथे विठ्ठल दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. बंद दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी अहमदाबाद येथील या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. आज या जवानांनी पंढरपूर शहरात फेरी मारून विठ्ठल मंदिर व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha reservation agitation RAF Jawan in Pandharpur