#MarathaKrantiMorcha घटना दुरुस्ती करा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 July 2018

कोल्हापूर - भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली, तर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याच हाती केंद्राची आहे. त्यांनी केंद्रातील सदस्यांना सांगून दुरुस्ती करून घ्यावी. राज्यसभेत संख्याबळ कमी असले, तरी तेथे अन्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे दिली. 

घटनादुरुस्तीच्या निर्णयामुळे अन्य राज्यांतील घटकांनासुद्धा न्याय मिळेल, असे सांगत त्यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याला खड्यासारखे बाजूला काढा आणि तुमचे ऐक्‍य कायम ठेवा, असा सल्लाही दिला. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला त्यांनी आज भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टाने रद्दबातल केल्यानंतर यातून काही मार्ग निघतो का, यासाठी आम्ही देशातील आघाडीच्या वकिलांशी चर्चा केली आहे. घटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली तर मार्ग निघू शकतो. त्यासाठी लोकसभेत आवश्‍यक बहुमत पाहिजे. विद्यमान सरकारकडे ते आहे.’’ 

शेकडो वर्षांच्या पंढरपूरच्या वारीत काही अनुचित प्रकार घडला, असे कधी झाले नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारीत साप सोडल्याचे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे आहे. या वक्तव्यामुळे आंदोलन चिघळले.
- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation constitutional amendment sharad pawar