मराठा आरक्षणाबाबत एकमत, विरोधी पक्ष सहकार्य करेल- मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
Saturday, 28 July 2018

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे. बैठकीत मराठा आरक्षण देण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. यामध्ये विरोधी पक्षदेखील सहकार्य करेल. राज्यात शांतता प्रस्थापित करा. आत्महत्येसारखी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये. याबाबत, राज्य मागास आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा. शासन तो लवकरात लवकर मंजूर करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे. बैठकीत मराठा आरक्षण देण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. यामध्ये विरोधी पक्षदेखील सहकार्य करेल. राज्यात शांतता प्रस्थापित करा. आत्महत्येसारखी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये. याबाबत, राज्य मागास आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा. शासन तो लवकरात लवकर मंजूर करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले आहे.

या सरकारने आरक्षणाचा कायदा मंजूर केला, परंतु, न्यायालयाने तो निर्णय स्थगित केला. मागास आयोगाचेही काम वेगाने चालू आहे. आयोग स्वतंत्र असल्याने त्यांच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. तरीही आयोगाने लवकरात लवकर छाननी करण्याची विनंती आयोगाला केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारची दिरंगाई करण्यात येत नाही. उलट, राज्य सरकार आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई झाली आहे. थेट गुन्हे सोडून सगळे गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिस संचालकांना आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. केवळ पोलिसांवर हल्ले दगडफेक केली असल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, हिंसाचाराच्या मार्गाने हे प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, मेगा भरतीत मराठा बांधवाच्या मनात संभ्रम निर्माण झाले असतील. परंतु, असा समज करुन घेण्यात येऊ नये मेगा भरतीत मराठा बांधवांना योग्य न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition parties will cooperate with Maratha reservation says Chief Minister