आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन तरुणांनी एका बंद अवस्थेतील विजेच्या मनोऱ्यावर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. सुमारे तीन तासांनंतर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी आंदोलन मागे घेतले.

बेल्हे येथे आज (ता. १) सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित ‘जुन्नर बंद’ आंदोलनात सहभागी होत गावात शांततेत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. येथील कैलास औटी व शरद औटी या दोन तरुणांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्री मुक्ताबाई मंदिरामागे असलेल्या वळण बंधाऱ्याजवळच्या बंद अवस्थेतील उंच मनोऱ्यावर चढून भगवे झेंडे फडकावत ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर जवळपास तीन तासांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी मनोऱ्यावरून खाली उतरून प्रशासनास निवेदन देत आंदोलन मागे घेतले.
याप्रसंगी मंचरचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, जुन्नरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश उगले, गावकामगार तलाठी रोहिदास वामन, आर. सी. कुमावत, पोलिस पाटील बाळकृष्ण शिरतर आदी उपस्थित होते.