
शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल
13 हजार मतांनी विजयी
औरंगाबाद: विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी 13 हजार 892 मतांनी विजय मिळवत एमआयएम पक्षाचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांचा पराभव केला.
मध्य मतदारसंघात एकुण 14 मतदार नशीब आजमावत होते.
हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत राज्यात चर्चिला गेला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एमआयएमने विजय मिळविल्याने यंदा या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष राहिले. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, एमआयएमचे नासेर सिद्दीकी, वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कदीर मौलाना, भाकपचे ऍड. अभय टाकसाळ यांच्यासह उमेदवार रिंगणात या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली, पण एमआयएममधील वाद चव्हाट्यावर मांडले गेल्याने निवडणूक गाजली.
हेही वाचा - पंकजा मुंडे का पडल्या?
मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांपेक्षा शिवसेना व एमआयएम यांनी हिंदू, मुस्लिम अशी भावनिक भिस्त ठेवल्याचे चित्र शेवटपर्यंत राहिले. मा जैस्वालांनी पहिल्या फेरीपासुन आघाडी घेतली. सातव्या फेरीत त्यांची लिड 30 हजार 639 पर्यंत गेली. मात्र.8 व्या व 9 व्या फेरीत एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांनी ही लीड कमी करत 18 हजार 037 वर आणली. 14 व्या फेरी पर्यंत लिड तुटून 1043 वर आली. त्यानंतर सिद्दीकी यांनी 2837 मतांनी आघाडी घेतली.
पुढील फेऱ्यांमध्ये जैस्वालांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अखेर 24 व्या फेरीअखेर त्यांना 13 हजार 892 मतांनी विजयी झाले. जैस्वाल यांना 82 हजार 217 मते तर नासेर सिद्दीकी यांना 68 हजार 325 मते मिळाली. तिसर्या स्थानी वंचितचे अमित भुईगळ राहिले.
असा आहे मतांचा खेळ
प्रदीप जैस्वाल : (शिवसेना) 82,217
नासेर सिद्धीकी :(एमआयआम)- 68,325
अमित भुईगळ : (व.ब.आ) 27,302
कदिर मौलाना (महाआघाडी) - 7,290
नोटा - 1347
प्रदीप जैस्वाल 13,892 मताने विजयी