या कारणांनी झाला पंकजा मुंडेंचा पराभव... । Election Results 2019

दत्ता देशमुख
Thursday, 24 October 2019

बीड - सुरवातीला महायुतीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर चित्र एकदम पालटले. भाजपच्या गडाला बीडमधील मतदारांनी सुरुंग लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी मात केली. धनंजय मुंडे यांच्यासह आष्टीतून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आणि माजलगावातून प्रकाश
सोळंके विजयी झाले आहेत. केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा आणि गेवराईतून लक्ष्मण पवार विजयी झाले आहेत. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांत घामासान सुरू आहे. 

बीड - सुरवातीला महायुतीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर चित्र एकदम पालटले. भाजपच्या गडाला बीडमधील मतदारांनी सुरुंग लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी मात केली. धनंजय मुंडे यांच्यासह आष्टीतून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आणि माजलगावातून प्रकाश
सोळंके विजयी झाले आहेत. केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा आणि गेवराईतून लक्ष्मण पवार विजयी झाले आहेत. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांत घामासान सुरू आहे. 

परळीत पंकजा मुंडे यांच्यावर पहिल्या फेरीपासून आघाडी घेणाऱ्या धनंजय मुंडे यांनी 19 व्या फेरीअखेर 28 हजार 480 मतांची आघाडी घेतली होती. त्यांचा विजय निश्‍चित झाल्याने परळीत विजयी जल्लोषही सुरू होता. गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित यांच्यावर 6,791 मतांनी विजय मिळविला. इथे शिवसेनेचे बंडखोर
बदामराव पंडित यांनीही लक्षणीय मते घेतली.

आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी सुरवातीपासून भाजपच्या भीमराव धोंडे यांच्यावर घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. वृत्त लिहेपर्यंत आजबे 21 व्या फेरीअखेर 21 हजार मतांनी आघाडीवर होते. केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा यांनीही पृथ्वीराज साठे यांच्यावर सुरवातीपासून घेतलेली आघाडी कायम
राहिली. राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे पहिल्या फेरीपासून मागे होते. 17 व्या फेरीअखेर नमिता मुंदडा 21 हजार मतांनी आघाडीवर होत्या. त्यांचा विजयदेखील निश्‍चित आहे.

माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी 15 हजार 632 मतांची आघाडी घेतली. भाजपचे रमेश आडसकर सुरवातीपासून मागे आहेत. एकूण चित्र पाहता राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, भाजपचे लक्ष्मण पवार विजयी झाल्यात जमा आहेत. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, भाजपच्या नमिता मुंदडा व राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांचे मताधिक्‍क्‍यही पहिल्या फेरीपासून वाढतच गेल्याने
त्यांचीही विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे मानले जाते.

बीडमध्ये काका-पुतण्यांत घामासान सुरू असून बातमी लिहीपर्यंत राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर काका शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा साडेसहा हजार मतांनी पुढे होते. एकूणच सहा विधानसभा मतदार संघापैकी परळी, माजलगाव आणि आष्टी या तीन ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्यात जमा
आहे. केज व गेवराईत भाजपचा झेंडा फडकला आहे. बीडमध्ये मात्र घामासान सुरू आहे. 
 
परळीतील जय पराजयाची कारणे 
 
पंकजा मुंडे का पराभूत झाल्या? 

 • विशिष्ट कोंडाळ्यात अडकून पडणे पंकजा मुंडेंना घातक ठरले. 
 • अहंपणाच्या स्वभावाचाही फटका बसला. 
 • विकास कामे करताना सामान्यांशी नाळ जोडण्यात अपयशी 
 • समाज माध्यमांच्या विळख्यामुळे माध्यमांपासूनही दूर 
 • विकास कामे केलेली असतानाही त्याच्या उहापोहापेक्षा भावनिक राजकारणही नडले 
 • लोकसभेचा विजय हा मोदी लाट होती हे नाकारात स्वकतृत्व असल्याची भावना 

 
धनंजय मुंडे यांच्या जमेच्या बाजू 

 • मागच्या पराभवापासून कायम लोकांत मिसळून राहिले 
 •  सामाजिक उपक्रमांमध्ये कायम पुढाकार घेतला 
 • नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकहिताची कामे 
 • बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दहा रुपयांत जेवण 
 • पत्नी राजश्री मुंडे यांच्यामुळे महिला वर्गाची ×प्रोच वाढला 
 • पंकजा मुंडेंना विरोध नाही तर लोकहितासाठी राजकारण ही प्रतिमा करण्यात यश 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reasons of Pankaja Munde's defeat