Vidhan Sabha 2019 : मराठवाड्यातच MIM ला घरघर लागणार ?

माधव सावरगावे
Wednesday, 9 October 2019

  • मराठवाड्यातच एमआयएमला घरघर लागणार ?
  • मतदारांचा विश्वास टिकवण्यात एमआयएम अपयशी ?
  • वंचितसोबत युती तुटल्याचा एमआयएमला फटका ?

प्रक्षोभक भाषण, धार्मिक धृविकरणाचा फायदा घेत हैदराबादच्या एमआयएम पक्षाने ७ वर्षांपूवी मराठवाड्यात एन्ट्री मारली. ७ वर्षात एमआयएमची प्रचंड घौडदौड दिसली. पण आता एमआयएमला मराठवाड्यातच घरघर लागायला सुरुवात झालीय. कारण वंचित बहुजन आघाडीसोबत घेतलेली फारकत अडचणीची ठरणार आहे. जेव्हा वंचित आणि एमआयएमची युती होती, त्यावेळी इच्छुकांचीही संख्या जास्त होती. आता मात्र, एमआयएममधूनचं बंडखोरी करीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटलेत. त्यामुळं नांदेडमध्ये काँग्रेसनं एमआयएमला जसं परतवलं, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस परतवेल असा दावा केला जातोय.

पहिल्याच निवडणुकीत जिंकलेली मतदारांची मनं आता मात्र टिकवण्यात एमआयएम अपयशी ठरली. शिवाय पक्षांतर्गत कुरघोड्या, बंडखोरी, वेगवेगळ्या आरोपांनी पक्षाला हैराण करून सोडलंय.

लोकसभा निवडणुकीत वंचितसोबत एमआयएम असल्याने सगळ्यांनीच धसका घेतला होता. पण जसजशी निवडणूक जवळ येतेय, तसा वंचित आणि एमआयएमचा नूरच बदलून गेलाय. एरवी लाखोंच्या संख्येने होणाऱ्या सभा निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठे गेल्या हा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळेच जितक्या वेगाने वाढ झाली, त्याचंवेगाने मागे जाणार असं चित्र निर्माण झालंय. 

WebTitle : marathi news vidhansabha election MIM facing problem in marathwada

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhansabha election MIM facing problem in marathwada