'सरकार कांद्याला पण घाबरतंय'; शरद पवारांचा टोला

टीम ई-सकाळ
Thursday, 19 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत असल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा बंदी करण्यात आली आहे. यावरून पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

नांदेड : नाशिकमध्ये आज, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत असल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा बंदी करण्यात आली आहे. यावरून पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

गडकरी म्हणाले, ‘ते पुन्हा तिकीट मागतायत’

काय म्हणाले पवार?
पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेत कांदे फेकले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार घाबरले आहे. गेल्या चार दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांना विक्री बंद करण्यास सांगितले आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीतील दडपशाही आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. पवार म्हणाले, ‘लोकशाहीतील सामान्यांना आंदोलनाचा अधिकारच तुम्ही काढून घेत आहात. हे सरकार कांद्यालापण घाबरत आहे. तुम्ही पाकिस्तानला असं करू तसं करू, अशी भाषा करता. आधी कांद्याचं तरी निस्तररा.’

Video : आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघाची समाप्ती होईल : मेवाणी 

‘मुख्यमंत्री ही आकडेवारी सांगा’
पवार म्हणाले, ‘पाच वर्षे यांच्या पक्षाची दिल्लीत सत्ता. तेथे पुन्हा सत्ता आली आणि त्यांच्या यात्रेत ते सर्वाधिक टीका माझ्यावर करतात. ही फारच गमतीची गोष्ट आहे. राज्यात परिस्थितीत खूप बिकट आहे. मुख्यमंत्री राज्यात मोठी गुंतवणूक आल्याचे, कारखाने आल्याचे दावे करत आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत किती कारखाने बंद झाले याची आकडेवारी जाहीर करावी. कारखाने किती सुरू झाले हे सोडाच. किती जणांच्या हाताला काम मिळाले हे त्यांनी जाहीर करावे. अर्थातच त्यांच्याकडे ही आकडेवारी नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट, कारखानदारी उध्वस्थ झाली. यासाठी त्यांनी काय केले हे सांगावे.’

‘राजेंचे वंशजच अनाजी पंतांना शरण गेले’

शरद पवार म्हणतात...

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं काम सरकार करते
  2. नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या शिवरायांच्या किल्ल्यांवर सरकार छम छम सुरू करणार आहे
  3. आता माझं वय निवडणूक लढवण्याचं राहिलेलं नाही
  4. इथून पुढं नव्या पिढीला उभं करायचं, त्यांना संधी द्यायची
  5. नव्या पिढीचं नेतृत्व उभं करण्यासाठी आता काम करायचं
  6. महाराष्ट्रानं मला खूप काही दिलं, मुख्यमंत्री केलं, केंद्रात मंत्री केलं
  7. आता माझी जबाबदारी आहे की, महाराष्ट्रात सामान्य कुटुंबातील नेतृत्व उभं करायचं

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 nanded ncp leader sharad pawar statement on bjp government