मराठवाड्यात दुपारी 1 वाजेपर्यंत किती झाले मतदान? (Video)

राजेभाऊ मोगल 
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले. 

मतदानाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या भेटीवर उमेदवार व त्यांच्या नातेवाईक, पदाधिकाऱ्यांनी भर दिला होता. पाऊस आला तरी मतदान करून घ्या, अशा सूचना सर्वत्र करणे सुरु होते. विशेष म्हणजे प्रथमच पुणे, नाशिक औरंगाबाद येथील मतदारांना आपापल्या मतदार संघात घेऊन जाण्यासाठी वातानुकुलीत वाहनांची सोय करण्यात आली होती. दुपारनंतर मतदानाची टक्‍केवारी वाढेल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. 

रस्त्यावरील मतदारसंघातील मतदारांसाठी हॉटेलमध्ये जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रथमच बाहेर गावात असलेल्या मतदारांना आणण्यात येत असल्याचे चित्र जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाले. गावागावामध्ये मतदानाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting figure in Marathwada