नांदूरमध्यमेश्‍वरला महिन्यात "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

 नाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत वनविभागाकडून मिळालेत. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील पहिले ठिकाण असेल. "रामसर' दर्जामुळे पाणथळ अन्‌ पक्ष्यांच्या संवर्धनास मदत होईल. 

 नाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत वनविभागाकडून मिळालेत. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील पहिले ठिकाण असेल. "रामसर' दर्जामुळे पाणथळ अन्‌ पक्ष्यांच्या संवर्धनास मदत होईल. 
गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर 1907 ते 1911 दरम्यान, नांदूरमधमेश्‍वर धरण बांधण्यात आले. 90 वर्षांपासून धरणात गाळ साठत गेल्याने मोठ्याप्रमाणात पान वनस्पती तयार झाल्या. लहान बेटे देखील तयार झाली. त्यामुळे पक्ष्यांची संख्या इथे वाढत गेली. इथल्या अभयारण्यात दोनशेहून अधिक जातीचे पक्षी येतात. इथे 24 जातीचे मासे, चारशेहून अधिक जातीच्या वनस्पती आहेत. 25 फेब्रुवारी 1986 ला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास होत गेला. निसर्ग पर्यटन योजनेतंर्गत खाणगाव थडी येथे निसर्ग परिचय केंद्र सुरु झाले. या अभारण्यात युरोपसह विविध देशातून परदेशी "पाहुणे' येत असल्याने "रामसर'मुळे विकासाला आणखी हातभार लागेल. 

काय आहे रामसर? 
रामसर हे इराणमधील शहराचे नाव असून 1971 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचा मुद्दा मान्य झाला. तेंव्हापासून सरोवर, नद्या, तलाव, गवताळ पाणथळ मैदाने, समुद्र किनारे, दलदलीचे ठिकाण आदींच्या जगभरातील प्रस्तावांवर विचार करून त्यांना मान्यता दिली जाते. त्यांना "रामसर साईट' म्हणून संबोधले जाते. जागतिक वारसा म्हणून नोंद झालेल्या स्थळांना निधी उपलब्ध होतो व त्यातून विकास आणि संवर्धन होत असते. 

वन्यजीव विभागातर्फे "रामसर'साठी प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावातील त्रूटी प्राप्त झाल्या होत्या. त्रूटींची पूर्तता करुन प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आला आहे. त्याबाबत आमचा पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्याला महिन्याभरात "रामसर साईट'चा दर्जा मिळण्याची शक्‍यता आहे.
- अनिल अंजनकर (वन्यजीवचे वनसंरक्षक, नाशिक) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Environment