ग्रामपंचायत निवडणूकींसाठी भाजपची रणनिती ठरली! 12 नेते करणार प्रचार

12 BJP leaders to campaign for Gram Panchayat elections
12 BJP leaders to campaign for Gram Panchayat elections

मुंबई : आगामी ग्रामपंचायत निवडणूकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपची महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत पार पडली. तसेच विधान परिषद निवडणूकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच राम मंदीर निधी, कार्यालय निर्माण याबाबतही यावेळी चर्चा झाली. दरम्यान 12 नेते ग्रामपंचायत निवडणूकीसाठी राज्यभर प्रचार करणार असल्याचे या बैठकीत निश्चित झाले आहे. 

या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे उपस्थित होते.

विधानपरिषद निवडणूकीत भाजपचा पराभव झाला होता याबाबत सविस्तर चर्चा करत आढवा घेतला. नागपुर विधानपरिषदेत 5 दशकांनंतर परभाव झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हा पराभव का झाला यावर सविस्तर चर्चा करताना, उमेदवार निवडीत चूक झाली का? मतदार नोंदणी आणि संपर्कात कमी पडलो का? तीन पक्ष एकत्र आल्याने पराभव ओढवला का ? अशी सर्वांगाने चर्चा झाली.

येत्या ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी कशी करायची याची रणनिती आखण्यात आली. यामध्ये पक्षाचे 12 नेते ग्रामपंचायत निवडणूकीसाठी राज्यभर प्रचार करणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापैकी काही नेत्यांकडे जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमूख यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. 


येत्या काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर सह 5 निवडणूका होणार आहेत. या महापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडूण येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबतही चर्चा झाली.   बहुतांश महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली असली तरी काही ठिकाणी स्थानिक आघाडी करुन निवडणूक लढण्याची देखील तयारी भाजपने केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

ज्या जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यालय नाही तेथे कार्यालय उभारण्याबाबतही चर्चा झाली. काही ठिकाणी जागा घेतली तरी अद्याप कार्यालय उभारले नाही अशी स्थिती आहे. दरम्यान, कार्यालय उभारणीसाठी लागणारा निधी संकलन आणि काय तयारी करावी लागेल याची रणनिती ठरविण्यात  आली आहे.  


अयोध्येतील राम मंदीरासाठी देशभरातून निधी जमा करण्यात येत असून त्यासाठी भाजपही राम मंदीरासाठी निधी संकलन करणार आहे. राम मंदीरसाठी निधी सकंलन करण्यासाठी भाजपने समितीची स्थापना केली असून जास्तीत जास्त निधी जमा करण्याचा मानस केला आहे. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com