राज्यातीत ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण जास्त

राज्यातीत ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण जास्त

मुंबई: राज्यातील स्त्रियांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 (एनएफएचएस),मध्ये देण्यात आला आहे. महिलांच्या बहुतेक आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत मुलांमध्ये तसेच स्त्रियांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण वाढले आहे. जेवणाच्या सवयी, लोहाची कमतरता, कमकुवतपणा आणि अकाली प्रसूती ही यामागणी प्रमुख कारणे असू शकतात. एनएफएचएस -5 च्या आकडेवारीनुसार, 15 ते 49 वर्षे वयोगटातील 57.2 टक्के महिला अशक्त आहेत. एनएफएचएस -4 च्या अहवालात हेच प्रमाण 49.7 टक्के होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अशक्तपणाचे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये 68.9 टक्के अॅनेमियाचे प्रमाण आढळले आहे. गेल्या अहवालात 53.8 टक्के बालके अॅनेमिक आढळली होती. 

आहारातील बदल गरजेचे

भारतातील स्त्रिया प्रामुख्याने शाकाहारी आहार घेतात. ज्यात योग्य प्रमाणात लोह असतेच असे नाही. बाळाच्या जन्मापूर्वीच त्यांचे लोह-स्तर परिक्षण केले जाते आणि योग्य पातळीवर आणले जाते. बहुतेक स्त्रिया, आहारात आणि जे केवळ शाकाहारी जेवण घेतात. त्यांच्यात कमी प्रमाणात हिमोग्लोबिन दिसून येते. हे सामान्यत: कमी आहारामुळे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या स्त्रियांमध्ये किंवा सर्वाधिक डायट करणाऱ्या महिलांमध्ये आढळून येते. त्यामुळे स्त्रियांना पालक, गूळ, मांस इत्यादी लोहयुक्त आहार घेण्याबाबतही मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच, मासिक पाळीच्या दरम्यान झालेल्या रक्ताची कमतरता, योग्य लोह आणि व्हिटामिन सी च्या अधिक वापरामुळे ही कमतरता भरुन निघते. तसे झाले नाही तर महिलांना अशक्तपणा होऊ शकतो. ही परिस्थिती भारतात सामान्य आहे.
डॉ. संदीप गोरे, संचालक-आपत्कालीन चिकित्सा, फोर्टिस रुग्णालय
 
किशोरवयीन गरोदरपणात घट

नुकत्याच झालेल्या एनएचएफएस -5 च्या अहवालात महाराष्ट्रात 2019-20 या कालावधीत किशोरवयात होणाऱ्या गरोदरपणात घट झाली असून 7.6 टक्के एवढे त्याचे प्रमाण आहे. 2015 ते 16 हेच प्रमाण 8.3 टक्के एवढे होते. ज्यामुळे, सखोल विश्लेषण केले असता महिलांची अनेक बाबींमध्ये चांगली स्थिती आहे. मात्र, अनेक स्त्रियांमध्ये अॅनेमिया म्हणजेच अपुऱ्या जीवनसत्वामुळे येणारा अशक्तपणा वाढला असल्याची चिंतेची बाब ही सर्वेक्षणातून समोर आली आहे.

किशोरवयात लग्न होण्याच्या घटनांमध्येही कमतरता

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार, 18 वयोगटापूर्वी म्हणजेच किशोरवयात लग्न होण्याच्या घटनामंध्ये ही किंचितशी घट झाली असून सध्या त्याचे प्रमाण 21 टक्के आहे. 2015 -16 या कालावधीत हे प्रमाण 26.3 टक्के होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात किशोरवयीन विवाहीत महिला ज्या गर्भवती असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळले आहे. ग्रामीण भागात 10.6 टक्के किशोरवयीन विवाहित महिला गर्भवती आढळल्यात. तर, हेच प्रमाण शहरात 3.9 टक्के आहे. 

कुटुंब नियोजनाच्या पद्धतींमध्येही बदल

दरम्यान, राज्यात कुटुंब नियोजन करण्याच्या पद्धतींमध्ये ही बदल नोंदवण्यात आला असून ज्यात पुरुष गर्भनिरोधक वापरण्यात अधिक सहभाग दर्शवत आहेत. कंडोमचा वापर गेल्या चार वर्षांत शहरी भागात 7.1 टक्क्यांवरून 10.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर महिलांनी वापरलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर ही 2.4 टक्क्यांवरून घसरून 1.8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एकूणच महिला नसबंदीच्या पद्धतींमध्येही 50.7 टक्क्यांवरून 49.1 टक्के घट झाली आहे. शिवाय, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसुतीवर जास्त खर्च होतो असेही या अहवालात म्हटले आहे. 

राज्याच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने यंगा मातृत्व, बाल आरोग्य आणि कुटुंब नियोजनावर लक्ष केंद्रित केले ज्यामुळे हे बदल घडून आले. 

सर्वाधिक महिलांना शरीरातील लोह कमी झाल्याचा अॅनेमिया असतो. शिवाय, अजूनही काही कारणे आहेत. लहान मुलांना आपल्या मातेपासून होऊ शकतो. योग्य आहार आणि फॉलिक अॅसिड या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे, स्त्रियांना फॉलिक अॅसिड आणि किशोरवयीन मुलांनाही हे सार्वजनिक पातळीवर दिले जात आहे. डॉट्समध्ये आठवड्यातून एकदा लहान मुलांना अॅनेमियाच्या गोळ्या दिला जातात. शिवाय, अॅनेमियामुक्त भारत हा देखील उपक्रम सुरू आहे. जेवणातील घटक या आजारासाठी खूप महत्त्वाचे असतात.
डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक, राज्य

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Anemia women rural areas state Report of National Family Health Survey 5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com