भाजप नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

भाजप नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई: पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन वर्षापूर्वीच्या एका फौजदारी फिर्यादीमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणात येत्या 7 जानेवारी पर्यंत महाजन यांच्यासह दोघांविरोधात कठोर कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत.

कोथरूड पोलिस ठाण्यात महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद केली आहे, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारीला निश्चित केली आहे. तसेच संबंधित फिर्यादीबाबतची कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

तक्रार काय आहे

जळगावमधील निभोरा पोलिस ठाण्यात प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त एड विजय पाटील यांनी ही तक्रार केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद येथे वर्ग करण्यात आली. तक्रारीमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी मला पुण्यात बोलविण्यात आले. मात्र तिथे मला प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर फ्लॅटमध्ये नेण्यात आले.  ट्रस्टमधून मी आणि अन्य सदस्यांनी राजीनामा द्यावा असे सांगून काही जणांनी धमकाविले. त्या लोकांनी गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही राजीनामा द्या, असा आरोप पोलिस तक्रारीमध्ये पाटील यांनी केला आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या कथित घटनेवर आता फिर्याद केली आहे, त्यामुळे ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे, असा दावा महाजन यांच्या वतीने एड मिलिंद साठे यांनी केला आहे.

(संपादन- पूजा विचारे)

Bombay High Court give relief BJP leader Girish Mahajan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com