लिंबाचं लोणचं चवीनं खाणाऱ्यांनो, ही बातमी वाचाच!

रशीद इनामदार : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : हॉटेलांतील जेवणात समोरच्या वाट्यांमध्ये ठेवले जाणारे लोणचे आणि जेवण झाल्यानंतर खरकटे हात धुण्यासाठी समोर ठेवले जाणारे कोमट पाण्याचे फिंगरबोल यांचा घनिष्ठ संबंध असू शकतो, असे कोणी सांगितल्यास त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही; पण अनेक ठिकाणी या फिंगरबोलमधील लिंबाच्या फोडींपासून लोणचे तयार करण्याचा गोरखधंदा सुरू आहे.

अपुऱ्या झोपेमुळे होतो काम जीवनावर परिणाम

मुंबई : हॉटेलांतील जेवणात समोरच्या वाट्यांमध्ये ठेवले जाणारे लोणचे आणि जेवण झाल्यानंतर खरकटे हात धुण्यासाठी समोर ठेवले जाणारे कोमट पाण्याचे फिंगरबोल यांचा घनिष्ठ संबंध असू शकतो, असे कोणी सांगितल्यास त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही; पण अनेक ठिकाणी या फिंगरबोलमधील लिंबाच्या फोडींपासून लोणचे तयार करण्याचा गोरखधंदा सुरू आहे.

अपुऱ्या झोपेमुळे होतो काम जीवनावर परिणाम

धक्कादायक : इथं तयार होतं लिंबाचं लोणचं
मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांमध्ये विविध प्रकारची लोणची तयार करण्याचे कुटिरोद्योग सुरू आहेत. अत्यंत घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त वातावरणात हे खाद्यपदार्थ तयार केले जातात. याचे एक उदाहरण म्हणजे मानखुर्दमधील मंडाला झोपडपट्टी. दाट वस्ती. छोट्या-छोट्या गल्ल्या. त्यातून वाहत असलेली गटारे. सर्वत्र घोंघावणाऱ्या घरमाशा आणि डास. पावसाळ्यात तर या सर्व वस्तीचा नरकच बनून जातो. अशा वातावरणात तेथील अनेक गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरीच्या पुऱ्या आणि लोणच्याची निर्मिती केली जाते. बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेले हे उद्योग बहुतांशी बेकायदा असल्याचे सांगण्यात येते. प्रस्तुत प्रतिनिधीने या कुटिरोद्योगास प्रत्यक्ष भेट दिली असता जे दिसले ते भयंकर होते. लोणच्यासाठीच्या कैऱ्यांच्या, लिंबाच्या फोडी, मीठ-मसाला यांच्या गोणी तेथील घाणेरड्या कोंदट जागेत साठवून ठेवलेल्या होत्या. हे सामान तेथील कामगार अक्षरशः पायदळी तुडवित होते. त्या कामगारांची अवस्थाही पाहण्यासारखी होती.

भन्नाट फिचर्सवाले वन प्लसचे स्मार्ट फोन लाँच

कोठून येतात लिंब?
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या लोणच्यासाठीच्या लिंबांचा बराच मोठा भाग हा हॉटेलांतून आणला जातो. ग्राहकांनी हात धुतलेल्या फिंगरबोलमधील लिंबाच्या फोडी काही हॉटेलमालक जमा करून ठेवतात आणि त्या या लोणची उत्पादकांना स्वस्तात विकतात. या लोणच्याचे ग्राहक कोण असतात, अशी चौकशी केल्यानंतर तेथील जाणकारांनी सांगितले, की लोकप्रिय उत्पादकांच्या नावाने ही लोणची किराणा दुकानदारांना विकण्यात येतात. या दुकानांमध्ये ती सुट्या पद्धतीने विकली जातात. काही सामान्य हॉटेलांतही ग्राहकांच्या ताटात ही "मेड इन मानखुर्द' लोणची येतात, अशी माहितीही या जाणकारांनी दिली.

कारवाई होणार का?
दरम्यान, अशा प्रकारे लोणची, पुऱ्या आदी खाद्यपदार्थ तयार केले जात असतील, तर तो गुन्हा आहे. अशा ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला पाठवून पाहणी केली जाईल. दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली. याआधी पाणीपुऱ्या बनवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. तशी लोणची बनवणाऱ्यांविरोधातही कारवाई व्हावी, अशी मागणी मानखुर्दच्या नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dirty truth behind lemon pickle in mumbai mankhurd