आतली खबर.. शिवसेना आमदारांच्या बैठकीत 'ही' देखील झाली चर्चा ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपद मिळवायचंच यासाठी आता उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. त्या  पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांची शिवसेनेनं बैठक बोलावली. या बैठकीतही सर्वच आमदारांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तर, लोकसभा निवडणुकीच्या वेळीच अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर अमित शहांशी चर्चा झाली होती. तेव्हा तसं लेखी मिळावं, अशी मागणीच शिवसेनेनं केलीय. दरम्यान, बैठकीत आणखी काय चर्चा झाली ही माहिती सूत्रांकडून आम्हाला मिळाली आहे.. 

काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपद मिळवायचंच यासाठी आता उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. त्या  पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांची शिवसेनेनं बैठक बोलावली. या बैठकीतही सर्वच आमदारांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तर, लोकसभा निवडणुकीच्या वेळीच अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर अमित शहांशी चर्चा झाली होती. तेव्हा तसं लेखी मिळावं, अशी मागणीच शिवसेनेनं केलीय. दरम्यान, बैठकीत आणखी काय चर्चा झाली ही माहिती सूत्रांकडून आम्हाला मिळाली आहे.. 

आणखी काय झाली चर्चा ?

  • आगामी मंत्रीमंडळात निवडून आलेल्या आमदारांना प्राधान्य द्यावे अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी.
  • मागील सरकारमध्ये शिवसेनेने विधान परिषदेच्या आमदारांना झुकतं माप देत मंत्रीपदं दिली होती. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडून येणाऱ्यांना न्याय द्यावा अशी आमदारांची मागणी.
  • मागील सरकारमध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत हे विधान परिषद सदस्य मंत्री होते.
  • तीन वर्षांपूर्वी विधान परिषदेतले मंत्री बदला म्हणून मातोश्रीवर मोठं नाराजीनाट्य घडलं होतं. तेंव्हा उद्धव ठाकरेंनी कशीबशी आमदारंची समजूत काढली होती.
  • आता मात्र निवडून आलेल्या आमदारांनी सुरूवातीलाच मंत्रीपदासाठी तटबंदी बांधायला सुरूवात केली आहे. 
  • शिवसेना आमदारांच्या या पवित्र्यामुळे शिवसेनेत भाजपप्रमाणे बुजूर्ग नेत्यांसाठी मार्गदर्शक हे पद निर्माण होण्याची शक्यता.

 

 

जनतेचा आम्हाला विरोधात बसावे असाच कौल : शरद पवार

अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची चर्चा

सेनेच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. सर्वप्रथम आमची मुख्यमंत्रीपदाची मागणी होती. लोकसभे दरम्यान अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. दरम्यान काही कारणास्तव 144 -144 जागांवर आम्ही लढलो नाही. अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची चर्चा देखील झाली होती. आता भाजपने आम्हाला याबद्दल लेखी कळवावं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आपला निर्णय घेतील असं भाजप आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेना आता मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झालेली पहायला मिळतेय.

शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते. सत्ता स्थापनेबाबत आमदारांचा कल उद्धव ठाकरे जाणून घेतला. या बैठकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उपस्थित सर्व उमेदवारांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत 'साहेब तुम्हीच व्हा आता मुख्यमंत्री' अशा भावना व्यक्त केल्यात. दरम्यान आता शिवसेनेचे आक्रमक रूप आता पहायला मिळतंय.   

हीच ती 'वेळ' बनवा सरकार; 'मातोश्री'वर आज वाघांच्या जोर बैठका 

निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग आलाय. या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्याने यंदाच्या सत्तेत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे .

WebTitle : inside story about shivsena MLA meeting and demand of two and half year CM post


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inside story about shivsena MLA meeting and demand of two and half year CM post