देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारींची भेट; सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेची धावपळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

भाजप स्वबळावर 144 चा आकडा पार करु शकत नाही. अशात भाजपला शिवसेनेची जास्त गरज आहे. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावरुन अडून बसलीय. हेच पाहता दुसरा मार्ग काढण्यासाठी ही धावपळ सुरु असल्याचं बोललं जातंय.

मुंबई : पाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेची धावपळ सुरुय. सत्तेचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसला तरी दोन्ही पक्ष वेगवेगळी धावपळ करताना पाहायला मिळतायत. 

आज सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला पोहचले. जवळजवळ तासभर ते राजभवनात होते. मात्र, या भेटीचा उद्देश फक्त शुभेच्छा देणं हाच होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात दाखल झाले आणि कोश्यारींची भेट घेतली. दोन्ही पक्षांकडून ही भेट वैयक्तीक असल्याचं सांगितलं जातंय. 

भाजप स्वबळावर 144 चा आकडा पार करु शकत नाही. अशात भाजपला शिवसेनेची जास्त गरज आहे. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावरुन अडून बसलीय. हेच पाहता दुसरा मार्ग काढण्यासाठी ही धावपळ सुरु असल्याचं बोललं जातंय.

दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रिपदाची अट मान्य केली नाही तर दुसऱ्या राजकीय समीकरणांच्या शोधात शिवसेना असल्याचं दिसतंय. त्यामुळं ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.
 

आणखी बातम्या वाचा :

"युती'च्या मनोमिलनानंतर ठरणार आघाडीची रणनीती 

मुंबईत मुख्यमंत्रिपदाची बॅनरबाजी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra CM Devendra Fadnavis met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan