"युती'च्या मनोमिलनानंतर ठरणार आघाडीची रणनीती 

bjp-shivsena
bjp-shivsena

मुंबई - दिवाळी संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार असून, युतीमधील सत्तास्थापनेचा पहिला अंक यानिमित्ताने राज्याच्या राजकीय पडद्यावर पाहायला मिळेल. "युती'च्या निर्णयानंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची रणनीतीही निश्‍चित होईल. सर्वपक्षीयांच्या विधिमंडळातील नेतानिवडीबाबतही यानंतर तोडगा निघू शकतो. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस 54 तर कॉंग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार राजू पाटील निवडून आले आहेत. समाजवादी पक्षाने 2, बहुजन विकास आघाडी 3, तर एमआयएमने दोन जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या विधानसभेत 13 अपक्ष आमदार असतील. शिवसेना-भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी खल सुरू आहे. युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, यावर दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असली, तरीसुद्धा भाजप मात्र ते सहजासहजी देईल अशी स्थिती नाही. भाजपचे अन्य नेतेही आमचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा करीत आहेत. दुसरीकडे, सरकारमधील महत्त्वाची खाती आणि उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दर्शविल्याची चर्चा आहे. 

विधिमंडळातील नेतेपद 
विधिमंडळ सभागृहनेता निवडण्यासाठीच्या विविध राजकीय पक्षांच्या बैठकाही दिवाळीनंतरच सुरू होणार आहेत. भाजपचे विधिमंडळ नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे असतील. कॉंग्रेसच्या नेतेपदासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, याबाबतचा निर्णय दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा असली, तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यावर निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार असल्याने राजू पाटील हेच या पक्षाचे नेते असतील. समाजवादी पक्षाचे अबू आझमी, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे त्या त्या पक्षांचे सभागृहनेते असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com