आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात, शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांमध्ये नाराजी

आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात, शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांमध्ये नाराजी
Updated on

मुंबईः राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई आणि परिसरातील शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरायचे कसे असा प्रश्न शाळा मुख्याध्यापकांना पडला आहे. शाळा बंद असताना अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी राबविणार यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी दहावी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 23 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरायचे असून 12 ते 25 जानेवारी या कालावधीत पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील, तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसलेले विद्यार्थी परीक्षा अर्ज करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. 

विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज शाळेतूनच भरावा, अशी सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या विभागातील शाळा अद्यापही बंदच आहेत. तेथील मुख्याध्यापकांना परीक्षा अर्ज कसा आणि कधी भरून घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. राज्यातील अनेक भागातील दहावीचे वर्ग अद्यापही ऑनलाईन सुरू आहेत. शाळा प्रत्यक्षात सुरू कधी होतील, याबाबत संभ्रम आहे, अशा परिस्थितीत अर्ज कसे भरायचे याविषयी शिक्षण मंडळाने केणत्याही सूचना दिल्या नसल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले. 

दहावीचे बरेचसे विद्यार्थी मुंबईबाहेर आहेत. अशावेळी घाईघाईने ही प्रक्रिया सुरू करणे अन्यायकारक आहे. अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड तसेच विद्यार्थी स्वाक्षरी लागते, तसेच परीक्षा शुल्क देखील भरावे लागते. मूळात परीक्षा प्रवेश अर्ज ऑनलाईन भरले जात असल्याने आणि तत्काळ हॉलतिकीट जनरेट होत असल्याने जानेवारी महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात ही प्रक्रिया सुरू करायला हवी होती, असेही रेडीज यांनी सांगितले.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra SSC board exam 2021 form december 23 filling start

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com