"इतकी वर्ष सडली आणि 124वर अडली" - राज ठाकरेंचा प्रचाराचा झंझावात सुरु

"इतकी वर्ष सडली आणि 124वर अडली" - राज ठाकरेंचा प्रचाराचा झंझावात सुरु

मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये. 

गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना भाजप सरकारवर चौफेर टीका केली. "इतकीवर्ष सडली आणि १२४ वर अडली" म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. ED  चौकशीवरदेखील राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. कितीही झालं तरी माझं तोंड बंद होणार नाही याचा उच्चार राज ठाकरे यांनी केला. ज्यांना ED च्या धमक्या दिल्यात ते आता भाजपात गेल्याचं ठाकरे म्हणालेत. 

आरेवरूनही राज ठाकरे यांनी शिवसेना भाजपला सुनावलंय. शिवसेनेचे परायावारांमंत्री रामदास  यांनी आरे ला का वाचवलं नाही असा सवाल राज ठाकरे यानी उपस्थित केलंय. दरम्यान आरे कारशेड साठी बॉम्बे पोर्ट ट्रस्टची  जागा का वापरत नाही, ही जागा कोणाच्या घशात घालायची आहे ? हा प्रश्न पान विचारला.

राज ठाकरे यांच्या गोरेगाव सभेतील सर्व मुद्दे : 

  • राज ठाकरे गोरेगावमधून लाईव्ह : अगोदरच्या सरकारकडून आपण नव्या-नव्या थापा ऐकतो आहोत- राज ठाकरे
  • संपूर्ण भारतात मनसे पहिला पक्ष असेल ज्याने राज्याच्या विकासाचा आराखडा समोर ठेवला होता, विकासाची ब्लु प्रिंट मी समोर ठेवली - राज ठाकरे
  • मी विरोधीपक्षांसोबत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगली मध्ये पूर आला, EVM मशीन विरोधात मोर्चा काढायचा ठरला आणि मला ईडीची नोटीस आली, ईडीची चौकशीतून बाहेर आल्यानंतर मी सांगितले होते माझे थोबाड थांबणार नाही, ज्यांना अश्या धमक्या दिल्या ते भाजपात गेले.- राज
  • पक्षातील कार्यकर्त्यांनी सांगितले ही निवडणूक लढवली पाहिजे म्हणून ठरवले निवडणूक लढवावी, सरकार विरोधात व्यक्त व्हायला हवे म्हणून ही निवडणूक लढवत आहे - राज ठाकरे
  • मला न्यायालयाचे काहीही कळत नाही संगनमताने काम चालले आहे, आरे तील झाडे रात्री कापली गेली, हे केवळ सरकारला जाब विचारायला कोणी नाहीत म्हणून चालले आहे, पर्यावरण मंत्री रामदास कदम होते मग त्यांनी हे शिवसेनेने का थांबविले नाही- राज ठाकरे
  • गडकिल्ले लग्न समारंभासाठी देण्यासाठी सरकार निघाले आहे, महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही तर इतिहास आहे हे लक्षात घ्यावे, पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावरून भाषण करतात तो ही दुसऱ्याला दिला आहे, कोणीही सरकार विरोधात बोलण्यास तयार नाही- राज ठाकरे
  • ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजप शिवसेनेतकडून निवडणूक लढवत आहेत. बाळासाहेब असतांना असे लोक आयात करण्याची गरज लागली नाही. राजकारणाची थट्टा मांडून ठेवली आहे- राज ठाकरे
  • बँका बुडत आहेत, PMC बँकेचे ठेवीदार रडत आहेत, शेतकरी ओरडत आहेत , सरकार सांगत आहेत सव्वा लाख विहिरी बांधल्या , मुंबईतील खड्यांना सरकार विहिरी म्हणत असतील तर मला मान्य आहे - राज ठाकरे
  • ठाण्यात आताच खड्यात मुलगी पडली आणि गाडी अंगावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला . नव्याने येऊन नवीन थापा सांगितल्या जात आहेत, महापालिका शाळांत शिकलेल्या मुलींना महापालिकेत नोकरी देऊ म्हणाले, कोणाला मिळाली नोकरी सांगा, सरकारच्या विरोधात कोण बोलणार?- राज ठाकरे
  • मी विधानसभेची निवडणूक एक भूमिका घेऊन लढवत आहे, मी माझ्या प्रत्येक सभेत माझी भूमिका मांडणार आहे , ही निवडणूक मी तुमच्या मनातील राग व्यक्त करण्यासाठी लढवत आहे . सक्षम सबळ विरोधी पक्ष तयार करण्यासाठी ही निवडणूक मी लढवत आहे.- राज ठाकरे
  • ज्या वेळी माझ्या आवाक्यात सत्ता येईल त्यावेळी मी सत्तेसाठी तुमच्या समोर येईल, आज माझा आवाका विरोधीपक्ष म्हणून आहे हे मला माहित आहे- राज ठाकरे
  • 370 कलम रद्द केले त्याबाद्दल अभिनंदन पण पुढे काय? कोणीही नागरिक काश्मीर मध्ये जाऊ शकते का? तर नाही. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या समस्यांचे काय...काश्मीरवर बोलता मग महाराष्ट्रवर कोण बोलणार? - राज ठाकरे
  • माझा विकासाला विरोध नाही, आरेच्या जागी नाही तर बीपीटीची जमीन आहे तेथे कारशेड करावा, मुख्यमंत्री यांची भेट घेत मी त्यांना सुचवले होते, जिथून मेट्रो सुरू होते तेथेच कारशेड उभारायला काय जाते, पण ती जमीन कोणाच्या घश्यात घालायची आहे का?- राज ठाकरे
  • रेल्वेने लोक कसे प्रवास करतात हे माहीत आहे, काकोडकर समीतिने एक लाख कोटी रुपयात सर्व रेल्वे ठणठणीत होऊ शकते असा अहवाल दिला आहे आणि आम्ही जपानकडून मेट्रो साठी कर्ज घेत आहोत- राज ठाकरे
  • राजीनामे देऊ म्हणणारे कधीच राजीनामे देऊ शकले नाही, आमची इतकी वर्षे सडली म्हणणारी शेवटी 124 वर अडली - राज ठाकरे 

WebTitle : marathi news vidhan sabha 2019 raj thackerays goregaon speech

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com