१०वी-१२ वीचा निकाल कधी लागणार?, महाराष्ट्र बोर्डानं केलं जाहीर

पूजा विचारे
Tuesday, 14 July 2020

दोन्ही निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केलंय. निकाल कधी लागणार याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे. 

मुंबई-  कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आली. आता आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) तसंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकाल कधी लागेल याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान 14 तारखेला निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. स्वतः हा दोन्ही निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केलंय. निकाल कधी लागणार याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे. 

बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यामुळं 12वीचे निकाल 20 जुलैच्या आधी लागण्याची शक्यता आहे. हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही वर्गाचे निकाल लागणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

अधिक वाचाः  पुन्हा एकदा बेस्टच्या 'त्या' कामगारांवर कारवाईचा बडगा

लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबलेत. या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखांहून अधिक तर दहावीच्या 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. कोरोनामुळे 23 मार्चला होणारा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे मार्क दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचाः  भीमा कोरेगाव प्रकरण! वर्वरा राव यांची तब्बेत ढासळली; उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका

दरम्यान, आयसीएसई (ICSE) आणि सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल देखील लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे 11 वीच्या प्रेवशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून निकाल लागल्यानंतर महाविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

msbshe maharashtra ssc hsc result 2020 date not fixed yet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: msbshe maharashtra ssc hsc result 2020 date not fixed yet