गेल्या पाच वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे 3457 तक्रारी

गेल्या पाच वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे 3457 तक्रारी

मुंबई: गेल्या पाच वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे 3457 तक्रारी करण्यात आल्या असून त्या तक्रारींपैकी 263 प्रकणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या तक्रारींपैकी 974 प्रकरणांमध्येच प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

माहिती अधिकाराअंतर्गत कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी, 2015 ते 19 सप्टेंबर 2020 पर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 3457 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातील 974 प्रकरणांमध्येच प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यातील 622 प्रकरणे प्राथमिक चौकशीनंतर याप्रकरणांची चौकशी थांबवण्यात आले. केवळ 263 प्रकरणांमध्येच प्राथमिक चौकशीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल 3457 टक्के तक्रारींपैकी केवळ 7 टक्के प्रकरणांमध्येच प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच कालवधीत  3093 तक्रारी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता स्थानिक पोलिस ठाणे आणि इतर विभागांना पाठवण्यात आली आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्याप्रमाणात आर्थिक व्यवहार चालतात. त्यातून अनेक तक्रारी आमच्याकडे येतात. पण सर्वच प्रकरणं गुन्हे दाखल करण्यासारखी नसतात. काही प्रकरणांमध्ये सूड बुद्दीनेही आरोप केलेले असतात. ज्या प्रकरणामध्ये प्राथमिक पाहणीत गुन्हा झालाय असे वाटते, त्यांच्यात प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात येतात. त्यात कायदेशीररित्या गुन्हा दाखल होऊ शकतो, अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होता. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखा केवळ साडे साडे सहा कोटींपेक्षा अधिक रकमेच्या प्रकरणांमध्ये तपास करते. उर्वरीत प्रकरणं स्थानिक पोलिसांना पाठवण्यात येतात, असे एका अधिका-याने सांगितले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai Economic Offences Wing 3 thousand 457 complaints last five years

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com