गयाराम नेत्यांवर शरद पवार पहिल्यांदा बोलले; काय म्हणाले पवार?

टीम ई-सकाळ
Sunday, 15 September 2019

सध्याचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. या काळात सत्तेच्या पदराआड लपण्याऐवजी संघर्ष केला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांना लगावलाय. नवी मुंबईमध्ये नेरूळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

नेरूळ (नवी मुंबई) : सध्याचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. या काळात सत्तेच्या पदराआड लपण्याऐवजी संघर्ष केला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांना लगावलाय. नवी मुंबईमध्ये नेरूळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

आणखी वाचा : पुण्यात भाजप आमदारानेच पळविली नगरसेवकाच्या जेसीबीची चावी

नवी मुंबईतच मेळावा का?
नवी मुंबईमध्ये गणशे नाईक यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन, भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी नेरूळमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांनाच लक्ष्य केले. पवार म्हणाले, ‘अडचणी सगळ्यांच्यासमोर असतात. पण, त्यांना मोठ्या धाडसाने तोंड द्यायला हवे. सध्याचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. त्यात संघर्ष केला पाहिजे. सत्तेच्या पदरा आड लपण्यात काय अर्थ आहे.’

आणखी वाचा : सत्यजीत देशमुख म्हणाले, म्हणूनच केला काँग्रेसला रामराम...

राज्यात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्रात दर वर्षी १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात, अशी माहिती पवार यांनी भाषणात दिली. ते म्हणाले, ‘राज्यात दर वर्षी १६ हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती कोणामुळे ओढवली. हे खूपच गंभीर आहे. सत्तेवर आल्यानंतर सरकारने रोजगार निर्मिती करायची असते. पण, हे सरकार रोजगार घालवत आहे. अशांच्या जवळही जाता कामा नये?’

आणखी वाचा : आता जनतेच ठरलंय; कोल्हापूर उत्तरमधून 'यांना' आमदार करायच !

राष्ट्रवादी काँग्रेसला गळती
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी शिवसेना आणि भाजपमध्ये दाखल झाली आहेत. भास्कर जाधव, सचिन अहीर, गणेश नाईक यांच्यासारखी आघाडीच्या काळात मंत्रिपदे भूषवलेली मंडळी पक्षसोडून सत्ताधारी सेना-भाजपमध्ये दाखल झाली आहेत. त्यातच उदयनराजे भोसले यांनीही काल, राष्ट्रवादीला राम राम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे पवार यांनी नवी मुंबईत पक्ष सोडून जाणाऱ्यांनाच लक्ष्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai nerul ncp meeting sharad pawar speech about leaders joining bjp and shiv sena