संजय राऊत शरद पवार भेट, महाराष्ट्रातील नवी राजकीय समीकरणं ? 

संजय राऊत शरद पवार भेट, महाराष्ट्रातील नवी राजकीय समीकरणं ? 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळतेय. सध्या शिवसेना-भाजपमध्ये सत्ता समिकरणाचा तिढा सुरूच आहे. अडिच अडिच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झालंय..

राज्यात सत्ता कुणाची स्थापन होणार याबाबत सध्या वेगवेगळे तर्क लढवले जातायत. सत्तेत समान वाट्याच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत तणावाची स्थिती आहे.

"कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही"

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50-50 च्या सूत्रावर बातचीत झाली नसल्याचं म्हणतायत. तर शिवसेनेकडून सत्तेत समसमान वाट्याचा पुनरुच्चार केला जातोय. यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक विधान केलं गेलंय. शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सणसणीत विधान केलंय. 

"कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही" असं उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या बैठकीत बोलले असल्याचं समजतंय. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीसाठी जीबत नरमली नाही हेच संकेत यातून मिळतात. 

sanjay raut met sharad pawar new political chemistry in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com