Corona Vaccination: 28 दिवसानंतर उद्यापासून कोरोनाचा दुसरा डोस

Corona Vaccination: 28 दिवसानंतर उद्यापासून कोरोनाचा दुसरा डोस

मुंबई: राज्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आणि नाही नाही म्हणता 6 लाख 48 हजार 573 जणांना कोविड लसीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यातील कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस सोमवार 15 फेब्रुवारीपासून दिला जाणार आहे. पहिला डोस घेऊन ज्यांना 28 दिवस झाले असलेल्या लाभार्थीना हा दुसरा डोस दिला जाणार आहे.

बहुप्रतिक्षेत असलेल्या कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीला उत्साहात सुरुवात झाली. आजतागायत 6 लाख 48 हजार 573 जणांना कोविड लसीकरण झाले. त्यात 5 लाख 35 हजार 621 आरोग्य सेवकांनी तर 1लाख 12 हजार 952 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही दिवस कोविन ऍपमध्ये अडचणी आल्याने लसीकरणात बाधा आली.

लाभार्थींची कोविन ऍपमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. सुरुवातीच्या दिवसात कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लसीकरण धीम्या गतीने सुरू होते. लसीकरणाचा पहिला टप्पा अपेक्षेपेक्षा अधिक लांबला. मात्र एका लाभार्थीला दोन डोस घ्यायचे असल्याने 28 दिवसांच्या फरकाने हे डोस द्यावे लागणार आहेत. लसीकरणाचा दुसरा टप्पा अंतिम टप्प्यात असल्याने पहिल्या लाभार्थीना दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात येत असून महिन्याभरात हे लसीकरण संपवण्यात येणार असल्याचे  राज्य आरोग्य विभागाने कळवले आहे.

---------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Second dose of corona vaccination state will be given from Monday 15 February

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com