पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची बदली, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती

पूजा विचारे
Thursday, 14 January 2021

मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढेंची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.

मुंबईः मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. याआधी पाच महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

पाच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची थेट  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याव्यतिरिक्त चार अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे.  डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा- आधी बायकोला प्रेमानं शेवटचं 'Hug', मग दिलं लोकलमधून ढकलून

Tukaram Mundhe transferred Secretary of the State Human Rights Commission


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Mundhe transferred Secretary of the State Human Rights Commission