साताऱ्याच्या 'हा' निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अवलंबून

Will Chief Minister Uddhav Thackeray Takes Decision About Satara District ?
Will Chief Minister Uddhav Thackeray Takes Decision About Satara District ?

सातारा : सातारा शहराची हद्दवाढ डिसेंबरअखेर झाली नाही, तर ती 2021 पर्यंत प्रलंबित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 2021 च्या जनगणना कामासाठी जिल्हा, महानगर आणि नगरपालिका यांच्या सीमा 31 डिसेंबरपूर्वी निश्‍चित होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे साताऱ्याच्या हद्दवाढीचा निर्णय आता नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात रातोरात साताऱ्याच्या हद्दवाढीला मान्यता दिली होती. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक झाली. त्यानंतर भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही. त्यामुळे हा निर्णय आता सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीकडे आला आहे. दरम्यान, जनगणनेची प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. त्यासाठी वाढीव शहराची सीमा निश्‍चित करावी लागणार आहे. त्याची 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.

चालून आलेली हजाराेंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली

पूर्वतयारी म्हणून जनगणनेच्या प्रक्रियांमध्ये कोणाचीही दुबार गणना होऊ नये, तसेच कुणीही गणनेतून सुटू नये यासाठी पालिका, महसुली गावे, तालुके, उपविभाग व जिल्हा यांच्या सीमा व हद्दीत बदल होत असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव 31 डिसेंबरपूर्वी अंतिम करणे व त्याची अंमलबजावणी त्यापूर्वी करणे आवश्‍यक आहे. हे बदल राज्यातील जनगणना संचालनालय आणि मुख्य सचिव कार्यालयांना कळवावे लागणार आहेत. प्रशासकीय विभागाच्या सीमांमध्ये एक जानेवारी 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत कोणताही बदल केला जाणार नाही. 31 डिसेंबरपूर्वी केलेले सीमांमधील कोणतेही कायदेशीर बदल हे राज्यातील जनगणना संचालनालय आणि कुलसचिव कार्यालयाला कळविणे आवश्‍यक आहे.

साताऱ्याच्या विकासात आयकॉनिक भर : उदयनराजे भोसले 

साताऱ्याच्या हद्दवाढीला मंत्रालयीन स्तरावरील ग्रामविकास विभाग, नगरविकास विभागाने यापूर्वीच हिरवा कंदील दिला आहे. आता केवळ मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे आणि त्याचे नोटिफिकेशन निघणे एवढीच प्रक्रिया राहिली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या हद्दवाढीचे धनुष्य आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com