पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला

पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज, पुणे शहरात आली होती. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एरंडवणे परिसरात ईव्हीएम हटावचे पोस्टर लावले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी चर्चा केल्यानंतर काय घडले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर एरंडवणे येथे मनसेने ईव्हीएम हटावचा फलक लावल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या चर्चेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी समजूतीची भूमिका घेत माघार घेतली असून, अखेर  ईव्हीएम हटावचा फ्लेक्स झाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणाव निवळला. पोलिस अधिकाऱ्यांनी मनसेचे पदाधिकारी राम बोरकर, रुपाली पाटील, मंदार बलकवडे यांच्याशी चर्चा करून हा फलक काढून घेण्याची विनंती केली. सुरुवातीला पदाधिकारी हा फलक काढण्यास तयार नव्हते. परंतु, शेवटी अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन हा फलक झाकण्यात आला.

स्वारगेट परिसर भाजपमय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्राची स्वागतासाठी स्वारगेट परिसर भाजपामय झाला होता. रस्त्यावर सर्वत्र कमळ, नेते, कार्यकर्ते स्वागतासाठी तयारीत दिसत होते. सेव्हन चौकपासून ते सारसबाग पर्यंत सर्वत्र रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी झाली होती. ठिकठिकाणी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेचे स्वागतासाठी उभे होते. पर्वती मतदारसंघातून सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी कुमार मॉल, सेव्हन लव्ह चौक, पौर्णिमा टॉवर परिसरात ठिकठिकाणी वाद्य पथक, हलगी पथक, ढोलताशा पथकं उभी केली होती. तसेच हजारो कार्यकर्ते, महिला फेटे घालून हातात स्वागताचे फलक घेऊन स्वागतासाठी उभे होते. दरम्यान, सारसबागेजवळ भाजपकडून स्वागताची जय्यत तयारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे अशी वेशभुषा केलेले कलाकार मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे होते. या ठिकाणी शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. याच्या माध्यमातून फडणवीस सरकारने राज्यात आतापर्यंत राबविलेल्या योजना फ्लेक्स झळकवले जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com