मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पंधरा मिनिटांत पुण्यात काय घडले?

ज्ञानेश सावंत
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : केवळ फ्लेक्स लावून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे कान उपटले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार फलकबाजी केल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. 

पुणे : केवळ फ्लेक्स लावून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे कान उपटले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार फलकबाजी केल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेनेही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

आणखी वाचा : मुख्यमंत्री म्हणतात, ‘शिवसेनेच्या सगळ्या जागांवरील चाचपणीची माहिती नाही’

आणखी वाचा : लक्षात ठेवा, फ्लेक्स लावून तिकीट मिळणार नाही: मुख्यमंत्री 

महापालिकेची यंत्रणा लागली कामाला
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी जोरदार फ्लेक्सबाजी केली होती. यामुळे शहर विद्रुप करणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत कान उपलटले. त्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने फ्लेक्स उतरविण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीमुळे आता पुणे शहरातील सर्व बेकायदा फ्लेक्स उतरविण्यात येणार आहेत. तसेच बेकायदा फलक लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शंतनू गोयल यांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या जाळ्यात भाजपचे कोणते पदाधिकारी अडकणार याची उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis press conference flex statement pune corporation get into the action