esakal | मंदीची जबाबदारी भाजपचीच,राऊत यांचे स्पष्टीकरण,भुजबळ राष्ट्रवादीत सुखी. 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

मंदीची जबाबदारी भाजपचीच,राऊत यांचे स्पष्टीकरण,भुजबळ राष्ट्रवादीत सुखी. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकः सत्ताधारी शिवसेना देशातील मंदी बेरोजगारीला जबाबदार नाही का ? याप्रश्‍नावर श्री राउत यांनी आमचा काय संबध ? केंद्रात सत्तेत असलो तरी, पंतप्रधान,अर्थ, उद्योग अशा प्रमुख पाचही खात्याची जबाबदारी भाजपकडे आहे. शिवसेनेकडे एकच खाते असून शिवसेनेचा एक मंत्री काही देशाच धोरण ठरवित नाही. त्यामुळे देशाच्या ढासाळत्या आर्थिक परिस्थितीत शिवसेनेचा संबध काय ? असा प्रश्न शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

    ते म्हणाले,मंदीकडे राजकारणाचा विषय नाही. देश आर्थिक कोंडीत आहे. देशात अच्छे दिन आणायचे असतील तर मंदी दूर झाली पाहिजे. महासत्ता होण्याचे स्वप्न पहातांना रशियासारखी स्थिती उद्भवू नये. आर्थिक स्थिती ढासाळण्याला नोटाबंदी आणि जीएसटी हीच प्रमुख कारण आहे. दोन्ही गोष्टीना शिवसेनेचा विरोधच होता. असेही स्पष्ट केले. 


लोक धूवून घ्यायला आमच्याकडे वॉशीग मशीन नाही 
  श्री राउत म्हणाले, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थापनेपासूनच त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी फक्त प्रसार माध्यमातील चर्चा आहे. नारायण राणे भाजप तर भुजबळ शिवसेनेत या चर्चेविषयी राउत म्हणाले की, भाजपने त्यांच्या पक्षात कुणाला घ्यावे हा त्या पक्षाचा प्रश्‍न आहे. भुजबळ यांच्या प्रवेशाविषयी प्रसारमाध्यमात चर्चा आहे. पण स्वता भुजबळ यांनी मी आहे तेथे (राष्ट्रवादी कॉग्रेस) खूष असल्याचे जाहीर केले असतांना पून्हा त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी बोलणे योग्य नाही.

    शिवसेनेकडे माणस धुवून घेण्यासाठी वॉशीग मशीन सुध्दा नाही. असे सांगून भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाचा विषय टोलावून लावला. असे सांगून इच्छूकांच्या मुलाखती घेण्याची शिवसेनेत पध्दत नाही. त्यामुळे आजही कुठल्याही इच्छूकांच्या मुलाखती न घेता केवळ निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचा दावा श्री राउत यांनी केला. 

loading image
go to top