शेतकरी आत्महत्यांचे खापर सहकारमंत्र्यांनी फोडले विकास सोसायट्यांवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिक ः राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खापर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विकास सोसायट्यांवर फोडले. तसेच बुडालेल्या तीन आणि डबघाईस आलेल्या तेरा जिल्हा बॅंकांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

   राज्याच्या सहकार व पणन विभागातर्फे आज औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी बॅंक्वेट हॉलमध्ये सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यकारी सोसायट्या व अन्य संस्थांनी चांगले काम उभे केले असते तर बळीराजाला आत्महत्या करण्याची वेळच आली नसती, मात्र दुदैवाने त्यांनी ते केले नाही, अशी खंत मंत्री देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना रोख रकमेसह पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहकारमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्यांचे खापर सहकारी संस्थावर फोडले. 
     व्यासपीठावर खासदार भारती पवार, आमदार देवयांनी फरांदे, आमदार सीमा हिरे, सहकार आयुक्त सतीश सोनी, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल विभागीय सहनिबंधक व्ही. पी. पाटील, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, डी. एन. काळे, आर. सी. शहा यांच्यासह सहकार व पणन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मे लोक सहकाराशी जोडले गेलेले आहेत, चांगले काम उभे राहण्यासाठी याक्षेत्रात काम करताना राजकीय जोडे बाजूला ठेऊन काम करा, असा सल्ला देतानाच सहकार मंत्र्यांनी सभासदांच्या कल्याणासाठी, देशहितासाठी सहकारात काम करणे गरजेचे आहे, मात्र शेतकऱ्यांच्या बॅंका अशी बिरुदावली मिरविणाऱ्या राज्यातील 3 बॅंका बुडीत निघाल्या असून अन्य 13डबघाईस आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी काळात सहकाराला समृद्ध करायचे असेल तर पारदर्शी काम करा, असा आग्रह त्यांनी उपस्थितांकडे धरला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news subhash deshmukh tour